Skip to main content

Nothing is impossible

 Never Give Up

आजचा दिवस एकदम वेगळा आहे, कधी कधी दिवसाची सुरवात साधी असते, काहीतरी ठरवलेले असते आणि हळू हळू आपण ह्या दिवसातून किती आणि काय घ्यावे कळत नाही, तसा आहे हा दिवस. दुपारी आमची  software मीटिंग होती, Applex group बरोबर. वेगळा concept घेऊन एक software develop केले आहे.

दर शनिवार रविवार आम्ही दिव्यांग softskill training सुरु केले आहे. आजचा दिवस गप्पाचा होता. positive राहा, सकारात्मक राहा, never give up, बोलत राहा  हे असे सगळे जण सांगत असतात पण ते जगणारे असे 20 लोकांशी दुपारी गप्पा झाल्या.

प्रत्येकाची disability वेगळी, जगण्याची जिद्द वेगळी.

प्रथम आजचा पाहुणा अमोल बद्दल सांगते EATON मध्ये नोकरीला पोलिओ झाला आहे उत्तम शिक्षण आणि अतिशय मेहनीतीने ह्या position ला आलेला.

नंतर इरफान graphic design करतो आणि make my foundation ने घडविलेला स्वतःचा व्यवसाय करतो.

मृणाल Cerebral Palsy आहे MA झाली आहे आणि आता शाळेत इतिहास आणि भूगोल शिकवते. मला तिचे एक वाक्य खूप आवडले आजकाल लोकांचे परीक्षण हे केसांपासून पायांच्या नखापर्यंत काय घातले आहे ह्यावर होते. तिने उत्तम अभिप्राय दिला आणि सल्ला हि कि बोलताना सुद्धा किती, कसे, कोणत्या आवाजात बोलावे हे हि शिकवले पाहिजे.

तशीच अंजना लगास पायाला कॅल्लीपर्स आणि लायब्ररी चा course जिद्दीने पूर्ण केला आणि आज लायब्ररीयन म्हणून काम करते. आपला resume कसा लिहावा,काय बोलवे कसे बोलावे ह्याचे उत्तम प्रशिक्षण मिळाले म्हणाली.

रशिदा नुकतेच वडील गेलेत, बोलताना  डोळ्यात पाणी वडिलांच्या आठवणीने,  वडिलांनी घडवले आहे असे सांगून . ह्या प्रशिक्षणामुळे खूप मदत होईल.

सुरेश part-time नोकरी चालू आहे

संदीप कॉम्पुटर शिकवतो, कौशल्याधारित प्रशिक्षण घेतो शाळेत, बोलायचे कसे आणि स्वतःला कसे Present करावे कळले. अनेक अनुभव ऐकून  insipration मिळाले.

प्रवीण CP आहे, अवघड परिस्थिती शिक्षण घेतले आहे.  दहावी ला ४१% मार्क्स, commerce मध्ये पदवी आणि शाळे मध्ये administration काम पाहतो. Excel मास्टर आहे.

सगळ्यात शेवटी अजून एक guest  होते डॉ मयूर अतिशय हुशार, अनेकविध कला, स्पोर्ट्स आणि एका अपघातानंतर दोन्ही पाय  आणि डावा हात  कृत्रिम लावला आहे आता १२ पदव्या आहेत आणि डॉक्टरेट केले आहे. सध्या AISSM placement head आहे.

डॉ दिलीप देशपांडे स्वतः एका मोठ्या अपघातातून सावरून ज्यांनी आपले आयुष्य आता फक्त दिव्यांगांसाठी देण्याचे ठरवले आहे, ह्या सगळ्याच्या मागे उभे आहेत.

संध्याकाळी आमच्या किर्लोस्करचे सगळे सोडून बाहेर पडलेले ह्यांनी Ambassador Mr. Rengaraj Viswanathan ह्यांच्याशी discussion ठेवले होते.  Latin America मधील व्यवसायाच्या संधी. सगळा आमचा ग्रुपच believer आहे, विश्वास आपण एकमेकांवर ठेवायचा आणि त्यातून निर्माण होते एक positive chain.

रात्री धनंजय गोखले ह्यांचा भगवद्गीता वरील कोर्स.

अजून काय हवे असते एका दिवसातून.


Comments

  1. ग्रेट.
    तुलाच जमू जाणे..

    संजय सूर्यवंशी

    ReplyDelete
  2. धन्य आहेस तू🙏🙏

    ReplyDelete
  3. The world is full of beautiful things , you feel it because you believe in it. Wishing you everyday as value adding as today.! Very well worded and nicely articulated experience .

    ReplyDelete
  4. The world is full of beautiful things , you feel it because you believe in it. Wishing you everyday as value adding as today.! Very well worded and nicely articulated experience .

    ReplyDelete
  5. अनिता मॅडम, सुंदर likhqn

    ReplyDelete
  6. Believers group base us trust in each other and aiding to value addition by baby step by everyone and every Saturday. Glad we are together again.

    ReplyDelete
  7. जशी तू, तसंच तुझे लेखन. मोकळं, प्रामाणिक, स्फूर्तिपूर्ण ! असंच लिहीत रहा !
    सौमित्र

    ReplyDelete
  8. धन्यवाद सगळ्यांना

    ReplyDelete
  9. अप्रतिम अनुभूतीचे खूप छान शब्दांकन!

    ReplyDelete
  10. अप्रतिम अनुभूतीचे खूप छान शब्दांकन!

    ReplyDelete
  11. अप्रतिम अनुभूतीचे खूप छान शब्दांकन!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Blog Writing

Thanks Giving to Saumitra!! Samitra Gotikar hats off to you. How you keep engage all of us on  "Nivdak Udyami"  is amazing. Nivdak Udyami is the whats app group created by Saumitra Ghotikar and maintain by his team. Saumitra Ghotikar, Jow Web Services I met him  through one of friend's reference for some work. but after that I never though of that he is unknown  to me, just my old friend. He is inspiring many of us.  Always push me to do some thing independently. He give the vision about how  to look at the business. Because of him I get introduced in many business forum.  Actually i am not confident about me what I can do in the business. And he is the person always come with many proposals, some of them are still in process. But somewhere I am missing my enthusiasm.  Saumitra gave us opportunity to learn many this in this lockdown  period. He always keep business posting on. The whats app group is maintain by team...

Industrial Internet of Thing

IIoT – Industrial Internet of Thing सध्या अनेक प्रचलित शब्द आपल्यासमोर येत असतात planning, analysis , digital transformation, IOT असे अनेक आपण इथे लिहु शकतो. ह्या सगळ्याला व्यवसायात अर्थ असतात , आणि त्याचा उपयोग व्यवसाय वृद्धीसाठी होत असतो.  आपल्यासारख्या  सर्वसामान्य माणसांना त्याचे अर्थ , त्याचा उद्योगातील उपयोग , तसेच त्याचे फायदे ह्याबद्दल सहसा माहिती नसते पेक्षा आपल्या पर्यत आले तर सगळी माहिती करून मग त्यावर काम करू अशी साधारण धारणा असते. आज हा छोटा प्रयत्न आहे IIoT – Industrial Internet of Thing म्हणजे काय ? हे समजून घेण्याचा. IoT म्हणजे   यंत्र तत्र सर्वत्र असे म्हणता येईल. अगदी सोपी व्याख्या सांगायची म्हणजे मशीन चा मशीनशी संवाद. हा संवाद  साधण्यासाठी  लागणारे तंत्रज्ञान आणि ते सुद्धा मानवीय हस्तक्षेप नसताना. ही थोडी अवघड व्याख्या आहे पण अगदी सोपे आणि सरळ उदाहरण म्हणजे  आपण रोज चालायला जाताना हातात एक बँड घालतो आणि त्यावर आपण किती पळलो , किती चाललो ह्याचे पावला पावलागणिक नोंदणी असते. तुम्ही ...