Skip to main content

Industrial Internet of Thing






IIoT – Industrial Internet of Thing


सध्या अनेक प्रचलित शब्द आपल्यासमोर येत असतात planning, analysis , digital transformation, IOT असे अनेक आपण इथे लिहु शकतो. ह्या सगळ्याला व्यवसायात अर्थ असतात, आणि त्याचा उपयोग व्यवसाय वृद्धीसाठी होत असतो.  आपल्यासारख्या  सर्वसामान्य माणसांना त्याचे अर्थ, त्याचा उद्योगातील उपयोग, तसेच त्याचे फायदे ह्याबद्दल सहसा माहिती नसते पेक्षा आपल्या पर्यत आले तर सगळी माहिती करून मग त्यावर काम करू अशी साधारण धारणा असते.

आज हा छोटा प्रयत्न आहे IIoT – Industrial Internet of Thing म्हणजे काय?हे समजून घेण्याचा. IoT म्हणजे  यंत्र तत्र सर्वत्र असे म्हणता येईल. अगदी सोपी व्याख्या सांगायची म्हणजे मशीन चा मशीनशी संवाद. हा संवाद  साधण्यासाठी  लागणारे तंत्रज्ञान आणि ते सुद्धा मानवीय हस्तक्षेप नसताना.

ही थोडी अवघड व्याख्या आहे पण अगदी सोपे आणि सरळ उदाहरण म्हणजे  आपण रोज चालायला जाताना हातात एक बँड घालतो आणि त्यावर आपण किती पळलो , किती चाललो ह्याचे पावला पावलागणिक नोंदणी असते. तुम्ही ही  सगळी माहिती तुमच्या मोबाईलला घरी आल्यावर पाहू शकता, तुमच्या अनेक सोशल मिडियावर पोस्ट करू शकता. आणि हो त्यावर Likes ही मिळवू शकता.

हे एक वानगी दाखल उदाहरण आहे. पण मी असे म्हटले की माझी २ घरे आहेत, एका घराच्या गच्चीत मी मोठी बाग केली आहे आणि त्याला मला ठराविक वेळेस पाणी घालायचे आहे, तर मी हेच तंत्रज्ञान वापरून रिमोट पद्धतीने हे काम करू शकते  आणि तेही माझ्या हातातील मोबाईल वर.

ही सर्वं उदाहरणे घरगुती स्वरुपाची अथवा हेंल्थची असतीलही. पण जर  असे म्हटले की हेच तंत्रज्ञान वापरून आपण आपली चालू असणारे उत्पादन आहे तिथे बसून सुरु ठेवू शकलो तसेच मशीन मध्ये येणारी दुरुस्ती करायची असलयास त्यातील प्रत्येक पार्टचे  आपण कारखान्यात न जाता कुठे चूक आहे ते पाहू शकतो तसेच तेथील इंजिनियरला सूचना देऊ शकतो, ह्यालाच  IIoT – Industrial Internet of Thing चा वापर असे म्हणतात.

 हेच थोडे अधिक विस्तृत पणे सांगायचा प्रयत्न करणार आहे.

अगदी तंत्रज्ञान वापरून जर वाख्या करायची तर IoT म्हणजे यंत्र तंत्र सर्वत्र.  १९९९ च्या दशकात सर्वत्र ह्या तंत्रज्ञानाचा अधिक प्रचार व्हायला लागला. इंटरनेटच्या महाजालात अनेक प्रकारचे माहिती  विश्लेषण प्रणाली तयार होऊ लागल्या. तसेच अनेक प्रकारची माहिती संकलित होऊ लागली. त्याचबरोबर इंटरनेट प्रोटोकॉलचा वापर करून संगणकीय प्रणाली तयार करण्यात यश मिळवले. त्यामुळे मशिन मधील स्पंदनाच्या वापरातून त्याची माहिती डेटा स्वरुपात समोर येत गेली. ह्याचमुळे कोणत्याही दोन मशीन ला एकमेकांना जोडणे शक्य झाले.

१९८० ते १९९० च्या दशकात मशीनला सेन्सर जोडणे आणि त्यातून काही बुद्धीमतेवर आधारित माहिती मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो असे विचार मांडण्यात आले. परन्तु तेव्हा तंत्रज्ञानाचा इतका विकास झाला नव्हत्या त्यामुळे चिप्सही खूप  मोठ्या आणि अवजड होत्या,  तसेच त्यांतून माहिती काढणे अवघड होते.

नंतरच्या काळात RFID (Radio Frequency Identification) तंत्रज्ञान वापरून आणि बिनतारी यंत्रणेच्या  कमी उर्जेच्या चिप्स वापरून काही अंशी प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर मात्र इंटरनेटच्या  मायाजालचा वाढता प्रचार आणि प्रसार ह्यामुळे IPv6 च्या वापरामुळे अनेक IP  address एका मशीन ला जोडणे शक्य झाले. IOT क्षेत्रातील हे सगळ्यात मोठे पाऊल होते. Internet of Things असे नाव केविन अ‍ॅश्टनने दिले. तरी सुद्धा ह्याचा प्रसार आणि प्रचार व्हायला एक तप जावे लागले.

साधारण ह्याला  industry मधील चौथे revolution , चौथी क्रांती म्हणू शकतो. जसे आपण घरगुती उपकरणे किंवा हेंल्थ मधील काही उपकरणे जशी माहिती प्रसारित करत राहतात त्याचप्रमाणे Industry Internet of Things चे काम चालते. अनेक सेन्सर, बिनतारी यंत्रणा, बिग डेटा, Artificial Intelligence, Analytics वापरून प्रोसेस वर काम करणे शक्य होते.  ह्या तंत्रज्ञानाचा  प्रभावी  वापर फक्त एका मशीन पुरता मर्यादित न राहता संपूर्ण कंपनीच्या व्यवस्थापनात होतो. जसे की वेळेत delivery,  उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर अगदी सुरवात ते शेवट IOT चा वापर होऊ शकतो. तसेच आर्थिक  बाबतीतही उत्पादकांना ह्याचा फायदा होऊ शकतो. एखद्या मशीनचे देखभाल कशी आणि केव्हा करायची हे सुद्धा विकताना सांगू शकतो तसेच त्याचे कंत्राट घेऊ शकतो.

उत्पादनात क्षेत्रात IIoT मुळे उत्पादनात वाढ होण्यास आणि अधिक उत्पादन घेण्यास मदत होत आहे. ह्या तंत्रज्ञाचा उपयोग उत्पादन  बनवणे आणि त्याच्या वितरणाच्या पद्धती मध्ये बदल घडवत आहेत. उद्योग अधिक कार्यक्षम आणि मानवी वापरासाठी सुरक्षित होत आहेत. तसेच आर्थिक बचतही होऊ शकते

IoT च्या तंत्रज्ञानाचे मार्केट २०१८ साली $७२.३४ बिलीयन एवढे होते आणि त्याचा २०१९-२०२४.वाढीचा दर हा ८.६७% एवढा अपेक्षित आहे.

Reference:

https://www.zdnet.com/article/what-is-the-internet-of-things-everything-you-need-to-know-about-the-iot-right-now/




Comments

Popular posts from this blog

Nothing is impossible

  Never Give Up आजचा दिवस एकदम वेगळा आहे , कधी कधी दिवसाची सुरवात साधी असते, काहीतरी ठरवलेले असते आणि हळू हळू आपण ह्या दिवसातून किती आणि काय घ्यावे कळत नाही , तसा आहे हा दिवस . दुपारी आमची  software मीटिंग होती , Applex group बरोबर . वेगळा concept घेऊन एक software develop केले आहे . दर शनिवार रविवार आम्ही दिव्यांग softskill training सुरु केले आहे . आजचा दिवस गप्पाचा होता . positive राहा , सकारात्मक राहा , never give up, बोलत राहा   हे असे सगळे जण सांगत असतात पण ते जगणारे असे 20 लोकांशी दुपारी गप्पा झाल्या . प्रत्येकाची disability वेगळी , जगण्याची जिद्द वेगळी . प्रथम आजचा पाहुणा अमोल बद्दल सांगते EATON मध्ये नोकरीला पोलिओ झाला आहे उत्तम शिक्षण आणि अतिशय मेहनीतीने ह्या position ला आलेला . नंतर इरफान graphic design करतो आणि make my foundation ने घडविलेला स्वतःचा व्यवसाय करतो . मृणाल C erebral  Palsy   आहे MA झाली आहे आणि आता शाळेत इतिहास आणि भूगोल शिकवते ...

Blog Writing

Thanks Giving to Saumitra!! Samitra Gotikar hats off to you. How you keep engage all of us on  "Nivdak Udyami"  is amazing. Nivdak Udyami is the whats app group created by Saumitra Ghotikar and maintain by his team. Saumitra Ghotikar, Jow Web Services I met him  through one of friend's reference for some work. but after that I never though of that he is unknown  to me, just my old friend. He is inspiring many of us.  Always push me to do some thing independently. He give the vision about how  to look at the business. Because of him I get introduced in many business forum.  Actually i am not confident about me what I can do in the business. And he is the person always come with many proposals, some of them are still in process. But somewhere I am missing my enthusiasm.  Saumitra gave us opportunity to learn many this in this lockdown  period. He always keep business posting on. The whats app group is maintain by team...